शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात टाळा विजेचे विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:44 IST

सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  वीज पुरवठा घेतला जातो. पण, हा वीज पुरवठा अधिकृतपणे तात् पुरत्या वीज जोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक मंडळांचे आद्यक र्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकोडे टाकून  घेण्यात येणारा अनधिकृत वीज पुरवठा हा कोणत्याही क्षणी कोण त्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे गणेशोत्सव  साजरा करण्यासाठी अधिकृत वीज पुरवठा घेण्यास सार्वजनिक  मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सुरक्षेचे नियम पाळून  गणेशोत्सवात विजेचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणने  केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षेचे नियम पाळा; अपघात टाळा महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  वीज पुरवठा घेतला जातो. पण, हा वीज पुरवठा अधिकृतपणे तात् पुरत्या वीज जोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक मंडळांचे आद्यक र्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकोडे टाकून  घेण्यात येणारा अनधिकृत वीज पुरवठा हा कोणत्याही क्षणी कोण त्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे गणेशोत्सव  साजरा करण्यासाठी अधिकृत वीज पुरवठा घेण्यास सार्वजनिक  मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सुरक्षेचे नियम पाळून  गणेशोत्सवात विजेचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणने  केले आहे.

वीजवहन यंत्रणा हवी सदोष! सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक मंडळी  श्रीगणेशाच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे  पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील  वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक  आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी  लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच  करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात  येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोष, धोकाविरहित असणे  आवश्यक आहे. याशिवाय गणेशोत्सवात पावसाळी दिवस  असल्याने तसेच मंडपासाठी टीनचा वापर होत असल्याने वायर  लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या; पण टेपने जोडलेल्या  असल्यास वीज पुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्य ता असते.

देखावे तयार करताना घ्या काळजी! सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे  आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि  रोहित्रांच्या या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अं तरावर देखावे तयार करण्यास प्राथमिकता दिली पाहिजे. 

वीज पुरवठा व जनरेटरचे स्वतंत्र न्यूट्रलअनेक सार्वजनिक मंडळे जनरेटरचा वापर करतात; परंतु वीज  पुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीज  पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू करण्यात येतो; परंतु एकाच  न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते  आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही  परिस्थितीत वीज पुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची  काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे. 

मिरवणुकीतही राहा दक्ष!श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, या  दरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या आदीं पासून मिरवणुकीत वाहने, देखावे व व्यक्ती सुरक्षित राहतील,  याची काळजी घेतली पाहिजे.  तातडीच्या मदतीसाठी गरज  भासल्यास मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी महावि तरणच्या २४ तास सुरू असणार्‍या टोल फ्री क्रमांक १९१२,  १८00२00३४३५ किंवा १८00२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क  साधावा.