शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादूर(२१) याचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध आहेत. दोघांचा प्रेमविवाह ...

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादूर(२१) याचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध आहेत. दोघांचा प्रेमविवाह करण्याचा विचार होता. परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा यास विरोध होता. परंतु सदर युवक अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट करीत होता. त्यामुळे सदर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. मुलगा, मुलगी आणि दोघांचे पालक पोलीस स्टेशनला हजर झाले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार विवाह करता येत नाही, असे पोलिसांनी युवकाला समजावून सांगितले. परंतु प्रेमात आंधळा झालेला युवक कुणाचीही गोष्ट समजण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याने शेवटी टोकाचे पाऊल उचलत पोलीस स्टेशनच्या प्रांगणातच विष प्राशन केले. सदर घटनेने एकच खळबळ उडाली होती. हिवरखेड पोलिसांनी तात्काळ सदर युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे नेले असता, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यास सांगितले. याप्रकरणी हिवरखेड पोलीस चौकशी करीत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या प्रेमीयुगुलाने काही महिन्यांपूर्वीसुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.