शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून उडवले ४८ हजार!

By admin | Updated: November 5, 2015 01:44 IST

सायबर गुन्हे दाखल; बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक.

मोताळा (जि. बुलडाणा) : शहरापाठोपाठ मोताळा परिसरात सायबर गुन्हय़ांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. शहरालगतच्या बोराखेडी येथील शेतकर्‍याच्या मोबाइलवर अज्ञात ठगाने फोन करून बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन खात्यातून १२ हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना सोमवार २ नोव्हेंबर रोजी घडली, तर दुसर्‍या घटनेत बोराखेडी येथील मलकापूर आगारात बस चालक म्हणून कार्यरत असणारे दिलीप सदाशिव नारखेडे यांच्या खात्यातून याच पद्धतीने अज्ञात ठगाने ३६ हजार रुपये काढले. बोराखेडी येथील शेतकरी प्रल्हाद दगडू मोरे यांच्या मोबाइलवर फोन करून वरिष्ठ बँक अधिकारी बोलत असल्यासे भासवून त्यांच्या एटीएमचा पासवर्ड घेतला व लगेचच त्यांच्या खात्यातील १२ हजार रुपये काढून घेतले. पैसे काढल्याचा मॅसेज आल्यावर प्रल्हाद मोरे यांनी स्टेट बँकेत चौकशी केली असता, अज्ञात भामट्याने फसविल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. एटीएम खात्यातून रक्कम लांबविल्याची दुसरी घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. बोराखेडी येथील मलकापूर आगारात बसचालक असलेले दिलीप नारखेडे यांच्या ९९२२१३३0४४ या मोबाइल क्रमांकावर मलकापूर स्टेट बँकेच्या शाखेतून वरिष्ठ अधिकारी बोलतो, असे म्हणत एका अज्ञात भामट्याने १0१0२६५२३९६ या मोबाइल क्रमांकावरून फोन केला, तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. एटीएमचा पीन क्र मांक सांगा. नारखेडे यांनी पूर्ण माहिती सांगितल्यावर त्या भामट्याने तुम्हाला नवीन पासवर्ड मिळेल, असे सांगून फोन बंद केला. त्यावेळी अवघ्या १0 मिनिटांत त्यांच्या मोबाइलवर ३६ हजार रुपये काढल्याचा संदेश धडकला. नारखेडे यांनी स्टेट बँक शाखेत चौकशी केली असता, त्यांना फसवणूक झाल्याचे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला बँकेने दिला.