शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान पोलिसांच्या जाळय़ात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:01 IST

अकोला : सार्वजनिक वितरण प्रणालीचा २0 टन गहू काळाबाजारात नेत असताना मेहकर पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जप्त केल्यानंतर, या प्रकरणात चालकासह तिघांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीवरून पोलिसांनी वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावरून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य विकणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. आसिफ खानकडे बाळापूर-पातूर तालुक्यातील शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीचे कंत्राट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देकाळाबाजारात धान्य विकणारी टोळी सक्रियकॉल डाटावरून आरोपींचा शोधवाशिममधील मन्नान खानही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक वितरण प्रणालीचा २0 टन गहू काळाबाजारात नेत असताना मेहकर पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जप्त केल्यानंतर, या प्रकरणात चालकासह तिघांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीवरून पोलिसांनी वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावरून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य विकणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. आसिफ खानकडे बाळापूर-पातूर तालुक्यातील शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीचे कंत्राट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.१४ सप्टेंबर रोजी ४.३0 वाजताच्या सुमारास लव्हाळा फाटा येथे पोलीस, पुरवठा निरीक्षक व तहसीलदार यांनी नाकाबंदी करून एस.एच. ३७ जे ४६६३ क्रमांकाच्या ट्रकला अडवले असता, त्यात काळाबाजारात विक्रीसाठी नेत असलेला २५ लाख ६१ हजार ८२0 रुपयांचा २0 टन गहू दिसून आला. पोलिसांनी तो जप्त केला व आरोपी लक्ष्मण ऊर्फ प्रकाश सखाराम कुडके, अल्ताफ अजीज कच्छी दोघेही राहणार चिखली, वाजिद मिर्झा युसूफ मिर्झा व मो. फारूख मो. इब्राहीम दोघेही राहणार वाशिम यांना अटक केली व त्यांच्याविरुद्ध कलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी मेहकर पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांची सखोल चौकशी केली असता, सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य राज्याबाहेर विकणारे एक रॅकेट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बाळापूर व पातूर तालुक्याचा शालेय पोषण आहाराचा कंत्राट असलेला तसेच वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापयर्ंत मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आसिफ खान यांची चौकशी करण्यात आली. आसिफ खान यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय कार्यालयातील पोलिसांनी दिली.

कॉल डाटावरून आरोपींचा शोधमेहकर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपीचा कॉल डाटा काढला आहे. अटकेत असलेल्या आरोपींचा संपर्क कुणा-कुणासोबत आहे, ते कुठून धान्य आणतात, यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये कोण आरोपी आहेत, अशा सर्वांची चौकशी पोलीस करीत आहेत. त्यानुसार अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील रेशन माफियांचा पोलीस शोध घेत आहेत.

वाशिममधील मन्नान खानही ताब्यातवाशिम येथील मन्नान खान नामक रेशन माफियासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन बड्या रेशन माफियांनी मोठा गोंधळ घातला असून, चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला मेहकर पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी वाशिम येथील बडा रेशन माफिया मन्नान खान याला अटक केली असून, यामध्ये आणखी रेशन माफियांवर कारवाईचा फास आवळल्या जाणार आहे.