शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अर्धरब्बी तूर, तिळाची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करा!

By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST

विदर्भातील शेतकर्‍यांना सल्ला;पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे आपत्कालिन नियोजन.

अकोला : विदर्भात पाऊसच नसल्याने खरिपातील पिकांना झळ बसली असून, अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवे आपत्कालिन पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये अर्धरब्बी तूर व तीळ आदी पिकांची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पेरण्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, अनेक शेतकर्‍यांनी पेरणी थांबविली आहे. त्यामुळे पेरणी न झालेल्या क्षेत्रावर पुरेसा पाऊस झाल्यावरच शेत पेरणी करण्याचा सल्ला या नियोजनात देण्यात आला आहे.अर्धरब्बी पिकांच्या पेरणीसाठी अनेक वाण व पेरणीसंबंधी माहिती देण्यात आली आहे. यात सलग तूर पेरणी करायची असल्यास शेतकर्‍यांनी पीकेव्ही तारा, आशा (आयसीपीएल ७१९) बीएसएमआर ७३६,सी-११ यापैकी एक वाण वापरावे, लागवड करताना ४५ बाय २0 असे अंतर ठेवावे. अर्धरब्बी तूर व अर्धरब्बी तिळाची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करता येते.पर्यायी पिके घ्यावयाचे असल्यास सूर्यफुल, तीळ एन-८,एकेटी-६४,बाजारी पिकेव्ही राज, श्रद्धा, सबुरी हे तर एरंडीचे एकेसी-१,जीसीएच-४, ५, ६, डीसीएच-११७, ३२ चे वाण पेरणीसाठी वापरावे. यामध्ये शेतकर्‍यांना बाजरी-तूर, सूर्यफुल-तूर, तीळ-तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येईल. पाऊस चांगला झाल्यास पावसाचे पाणी जागेवरच मुरवावे लागणार असून, मातीची धूप कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी जास्त पाणी झाले असेल, तेथील पाण्याचा निचर्‍याकरिता खरीप पिकामध्ये पेरणीनंतर ३0 दिवसांनी डवर्‍यांचा जानकुळास दोरी बांधून प्रत्येक दोन ओळीनंतर सरी पाडणे आवश्यक आहे. दरम्यान, जून, जुलैमध्ये पेरणी केलेल्या कपाशी, सोयाबीनला पाण्याचा ताण पडत असल्याने, त्या ठिकाणी ओलिताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे संरक्षण ओलित करण्याची गरज आहे. पेरणी न झालेल्या क्षेत्रावर रब्बी पिकाचे नियोजन करायचे असल्यास अशा जमिनीला वखराची आडवी व उभी पाळी देऊन जमीन तणविरहित ठेवावी. आलेल्या पावसाचे संधारण मात्र करावे लागणार आहे. पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांपुढे आता अर्धरब्बी पिकांचा पर्याय आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्यातील पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकर्‍यांनी या नियोजनानुसार पेरणी करणे अपेक्षित असल्याचे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी सांगीतले.