शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी भोवली; जलप्रदाय विभागाचा फिटर बडतर्फ

By admin | Updated: January 20, 2016 02:04 IST

अकोला मनपा आयुक्तांचा निर्णय; जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

अकोला: महाजनी जलकुंभातील व्हॉल्व्ह मनमानी पद्धतीने बंद करणे संबंधित जलकुंभावर नियुक्त केलेल्या पराग कांबळे नामक फिटरच्या अंगलट आले. मानधन तत्त्वावर कार्यरत या कर्मचार्‍याला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय मंगळवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. आयुक्तांच्या निर्णयामुळे जलप्रदाय विभागातील कामचुकार व नगरसेवकांच्या प्रभावाखाली कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.कान्हेरी ते आळंदा फाटा दरम्यान महापालिकेची मुख्य जलवाहिनी १८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता फुटली होती. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला ९00 व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गत दोन महिन्यांत शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी चक्क पाच वेळा फुटली. यावेळी महाजनी जलकुंभात जलसाठा करणारा व्हॉल्व्ह पराग कांबळे नामक फिटरने बंद केला. पाण्याचा दाब सहन न झाल्याने कान्हेरी ते आळंदा फाटानजीक जलवाहिनी फुटल्याचे समोर आले. परिणामी संपूर्ण शहराचा किमान तीन दिवसांसाठी पाणीपुरवठा खंडित झाला.जलवाहिनी फुटण्यासाठी जलप्रदाय विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले. जलशुद्धीकरण केंद्रावर बसविण्यात आलेल्या दोन नवीन पंपांमुळे पाण्याचा दाब (प्रेशर) वाढत असला तरी हा दाब नियंत्रित करण्याची जबाबदारी या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांची आहे. हा प्रकार घडल्यानंतर महाजनी जलकुंभाची जबाबदारी असणार्‍या शाखा अभियंता आर. इंगळे यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर मंगळवारी मानधन तत्त्वावर कार्यरत फिटर कांबळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.