शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक पोलीस हेड कॉन्स्टेबल गजाआड

By admin | Updated: September 25, 2015 01:07 IST

ट्रक सोडण्यासाठी चालकाकडून घेतले अडीच हजार.

अकोला: बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संजय लांडे यांच्या लाचखोरीची घटना उलटून आठवडा होत नाही, तोच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीराम तायडे याला २५00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पातूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. एका ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणार येथून वीटभट्टीसाठी लागणारी वाळू भरून तो पातूरमार्गे चोहोट्टा बाजार येथे नेत असताना, आरटीओ विभागाच्या भरारी पथकाने ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू असल्याने पथकाने पातूर पोलीस ठाण्यात ट्रक उभा केला. त्यानंतर ट्रक सोडविण्यासाठी ट्रकचालक पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीराम तुळशीराम तायडे (४८) याने चालकाकडील रॉयल्टीचा परवाना स्वत:कडे घेतला आणि ट्रक सोडण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली. ट्रकचालक व तायडे यांच्यात तडजोड होऊन २५00 रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पातूर पोलीस ठाण्यात सापळा रचला. हेड कॉन्स्टेबल काशीराम तायडे हा या सापळय़ात अडकला. २५00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. त्याचेविरुद्ध एमव्ही अँक्टनुसार कलम १२२ व १७७ गुन्हा दाखल केला.