शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे २७३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित २५० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये देऊळगाव येथील तीन, तर भंडाराज बु., गीता नगर, डोंगरगाव, तापडीया नगर, लहान उमरी, डाबकी रोड, जठारपेठ व कापशी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालात राऊतवाडी येथील चार, शेलू बोंडे ता. मूर्तिजापूर येथील दोन, शिवणी, गोकुळ कॉलनी, गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी, दुर्गा चौक व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
७२ वर्षीय महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रामटेक ता. मूर्तिजापूर येथील ७२ वर्षीय महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना २६ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
१४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन,तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १४ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७१४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १०,६१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७१४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.