शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, बीडची भेसळयुक्त ढेप बाजारात

By admin | Updated: March 20, 2017 02:45 IST

अकोल्यातील ढेप उद्योजक त्रस्त; भेसळीमुळे पशूंच्या जीवितास धोका.

संजय खांडेकर अकोला, दि. १९- अमरावती आणि बीडची भेसळयुक्त ढेप गत काही महिन्यांपासून अकोल्याच्या बाजारपेठेत आली असून, त्याचा जबर फटका पशुपालक आणि पशूंच्या जीविताला सोसावा लागत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.अकोल्यातील सरकी ढेपला देशभरात मोठी मागणी आहे. अकोल्यातील ढेप मध्य प्रदेशापासून, राजस्थानसह विविध राज्यांत पोहोचते. ढेपची मागणी सातत्याने वाढल्याने सरकीला २२00 ते २२५0 रुपये क्विंटलपर्यंत भाव आहे.मात्र अमरावती आणि बीडच्या ढेप उद्योजकांनी २0३0 ते २१00 पर्यंतच्या भावात मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत सरकी आणली. मराठवाडा, विदर्भातच नव्हे, तर देशभरात ही सरकी पोहोचली आहे. कापसाचे आणि ढेप तयार करणार्‍या इतर पिकांचे भाव गडगडले नसताना ढेप स्वस्त कशी, या विचारात अकोल्यातील उद्योजक पडले त्यामुळे या मागच्या कारणाचा शोध घेतला असता, अमरावती आणि बीडने देशभरातील बाजारपेठ खिळखिळी केल्याचे समोर आले. तांदळाची साल, कॉफी आणि पामचा चुरा, मक्याचा चुरा ढेपमध्ये भेसळ करून स्वस्त दरात ढेप बाजारात आणली जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे, त्यामुळे ढेपचे भाव घसरले आहे. एकीकडे ढेपचे भाव वाढल्याने पशुपालक त्रासलेला असताना स्वस्त दरात मिळणारी भेसळयुक्त ढेप तो विकत घेऊन ढोरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी याची तातडीने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. काही उद्योजकांवर याप्रकरणी ठोस कारवाई झाल्यास मोठे घबाड उजेडात येऊ शकते.अकोल्यात उरले केवळ १५ उद्योग अकोला औद्योगिक वसाहतीत ढेप निर्मितीचे ४५ उद्योग होते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून बनावट ढेपमुळे अचानक ढेपेची मागणी घटली. त्यामुळे अकोल्यातील २0 उद्योजकांनी सरकी आणि इतर ढेपची निर्मितीच तात्पुरती थांबविली आहे. अकोल्यात केवळ १५ उद्योजक ढेपची निर्मिती करीत आहेत. या तुलनेत अमरावतीत २0 आणि आणि बीडमध्ये ५0 कारखाने सुरू आहेत.आरोग्य, दुधावर परिणामभेसळयुक्त ढेप खाल्याने पशूंचे लिव्हर तर खराब होत आहेच, सोबतच दुधाळ जनावरांच्या दुधावरही याचा परिणाम होतो. तांदुळाच्या धानाचा चुरा आणि मक्याचे वेस्टेज किती प्रमाणात ढेपमध्ये भेसळ करावे, याचे प्रमाण असते, ते चुकले की परिणाम होतो, अशी माहितीदेखील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली आहे.