शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उप मुख्यमंत्री पवार यांची घोषणा : मंगळवारी होणार निर्णय.

वाशिम : विदर्भ व मराठवाड्यात पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. वाशिम जिल्हय़ातील केवळ वाशिम व रिसोड तालुक्यांचाच समावेश दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र, मी स्वत: जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली असता उर्वरित चारही तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करण्यासाठी येत्या मंगळवारी होणार्‍या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आज १६ ऑगस्ट रोजी वाशिम येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री मनोहर नाईक, आमदार ख्वाजा बेग, सुभाषराव ठाकरे, आमदार प्रकाश डहाके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, सोनाली ठाकूर, माधवराव अंभोरे, इमरान कुरेशी, सुनील पाटील, गजानन देशमुख, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती. निर्धार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले. यावेळी निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-सेनेवर तोफ डागत महाराष्ट्राला आघाडी सरकारच तारू शकते, असा विश्‍वास दिला. वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने पैनगंगा नदीवर बंधारे बांधून शेतकर्‍यांसाठी सिंचनाच्या व्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. सद्य: परिस्थितीमध्ये मराठवाडा व विदर्भात पाऊस अल्प असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मात्र, केंद्रामध्ये असलेल्या भाजप सरकारला याची थोडीही चिंता नाही. केंद्र सरकारने आतापर्यंंत एखादी टीम मराठवाडा व विदर्भाच्या दौर्‍यावर पाठविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना शेतकर्‍यांचे आता काही देणे-घेणे नाही. हे आहेत काय त्यांचे अच्छे दिन, असा टोलाही मारण्यास पवार चुकले नाहीत. आता काही महिन्यातच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापुढे भाजपच्या खोटारड्या आश्‍वासनाला बळी न पडता आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सिंधुताई तुपकर यांनी, तर आभार माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.