शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागरी विमान वाहतूक सेवेत अकोल्याचा समावेश होणार!

By admin | Updated: August 25, 2016 02:05 IST

अकोला हद्दवाढीचा निर्णय लवकरच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

अकोला, दि. २४: नागरी विमान वाहतूक सेवेत राज्यातील अकरा विमानतळांमध्ये अकोल्याचाही समावेश केला जाणार असून, हद्दवाढ लवकरच होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. राजेंद्र पाटणी व सभापती विजय अग्रवाल यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली राज्यातील दहा विमानतळावरून नागरी विमान वाहतूक सेवेला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये अकोल्यातील शिवणी विमानतळाचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी राज्य सरकारचा करार झाला. नागरी विमान वाहतूक सेवेत अकोल्याचाही समावेश करावा, अशी आग्रही मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरली होती. त्यासंदर्भात बुधवारी मुख्यमंत्र्यांनी आ. शर्मा, आ. सावरकर यांना आश्‍वस्त केले. केंद्र सरकार व भारतीय विमानतळ प्राधिकरण राज्य सरकारला सर्व सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ निश्‍चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देणार सहाय्यता निधीशहरात आदर्श कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर शोषखड्डय़ात बुडून मृत्यू झालेल्या कृष्णा बहल व सिद्धेश धनगावकर या बालकांसह बोरगाव मंजू येथील श्याम संजय सोळंके, अनिल अरुण लांधे, मोठी उमरीतील रमेश बळीराम करंगळे, आकोट तालुक्यातील एदलापूर येथील कपील समाधान दांडगे यांचा अपघाती मृत्यू झाला. मृतकांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याची मागणी आ. शर्मा, आ. सावरकर यांनी लावून धरली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.