शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांना मिळणार मालमत्तांचा नकाशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 14:03 IST

करप्रणालीच्या नोटिससोबत विवरण पत्र देण्याचा मनपाचा निर्णय

करप्रणालीच्या नोटिससोबत विवरण पत्र देण्याचा मनपाचा निर्णयअकोला : महापालिकेच्यावतीने अकोलेक रांना सुधारित करप्रणालीच्या नोटिसचे वितरण केले जात आहे. पूर्व झोनमधील मालमत्ताधारकांना नोटिस दिल्यानंतर येत्या सोमवारपासून दक्षिण झोनमधील नागरिकांना नोटिस दिल्या जातील. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी नोटिससोबतच त्यांच्या मालमत्तांचा नकाशा आणि विवरण पत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका प्रशासनाने १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. घर, इमारत तसेच प्लॉटच्या एकूण क्षेत्रफळाची अचूक नोंद व्हावी, यासाठी ह्यजीआयएसह्णप्रणालीचा वापर करण्यात आला, तसेच प्रत्यक्षात मोजमाप घेण्यात आले. सर्वेदरम्यान ३१ हजारांपेक्षा अधिक मालमत्तांना कर आकारणीच झाली नसल्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांनी आजपर्यंत महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. शहरातून सर्वाधिक कर चोरी दक्षिण झोनमधून होत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पूर्व झोनमधील नागरिकांना सुधारित करप्रणालीच्या नोटिस जारी केल्या. त्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती स्वीकारल्या. आक्षेप स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून येत्या सोमवारपासून दक्षिण झोनमधील मालमत्ताधारकांना नोटिस दिल्या जातील. ह्यजीआयएसह्णद्वारे सर्व्हे करणार्‍या कंपनीने अत्याधुनिक ड्रोनचा वापर करीत मालमत्तांची सुस्पष्ट छायाचित्र काढली. त्यामध्ये घर, इमारती, प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ तसेच त्यावर उभारलेले बांधकाम आदींचा समावेश आहे. दक्षिण झोनमधील नागरिकांना नोटिस देण्यासोबतच ड्रोनद्वारे काढलेल्या छायाचित्रांसह नकाशाची प्रत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तसेच विवरण पत्रदेखील दिले जाईल. त्यामध्ये प्रत्येक खोलीचे मोजमाप, बाल्कनी, शौचालय, बाथरूम आदींचा समोवश राहील. यामुळे आक्षेप नोंदवताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नसल्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. नवीन प्रभागांत टप्प्या-टप्प्याने वाढहद्दवाढीमुळे मनपा क्षेत्रात सामील झालेल्या नवीन प्रभागात ह्यजीआयएसह्णद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नवीन प्रभागातील नागरिकांना प्रत्येक वर्षाला २0 टक्के यानुसार पाच वर्षांच्या कालावधीत संपूर्ण सुधारित करप्रणाली लागू केली जाणार आहे.