शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांना मिळणार मालमत्तांचा नकाशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:30 IST

करप्रणालीच्या नोटिससोबत विवरण पत्र देण्याचा मनपाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्यावतीने अकोलेक रांना सुधारित करप्रणालीच्या नोटिसचे वितरण केले जात आहे. पूर्व झोनमधील मालमत्ताधारकांना नोटिस दिल्यानंतर येत्या सोमवारपासून दक्षिण झोनमधील नागरिकांना नोटिस दिल्या जातील. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी नोटिससोबतच त्यांच्या मालमत्तांचा नकाशा आणि विवरण पत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका प्रशासनाने १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. घर, इमारत तसेच प्लॉटच्या एकूण क्षेत्रफळाची अचूक नोंद व्हावी, यासाठी ‘जीआयएस’प्रणालीचा वापर करण्यात आला, तसेच प्रत्यक्षात मोजमाप घेण्यात आले. सर्वेदरम्यान ३१ हजारांपेक्षा अधिक मालमत्तांना कर आकारणीच झाली नसल्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांनी आजपर्यंत महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. शहरातून सर्वाधिक कर चोरी दक्षिण झोनमधून होत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पूर्व झोनमधील नागरिकांना सुधारित करप्रणालीच्या नोटिस जारी केल्या. त्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती स्वीकारल्या. आक्षेप स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून येत्या सोमवारपासून दक्षिण झोनमधील मालमत्ताधारकांना नोटिस दिल्या जातील. ‘जीआयएस’द्वारे सर्व्हे करणाऱ्या कंपनीने अत्याधुनिक ड्रोनचा वापर करीत मालमत्तांची सुस्पष्ट छायाचित्र काढली. त्यामध्ये घर, इमारती, प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ तसेच त्यावर उभारलेले बांधकाम आदींचा समावेश आहे. दक्षिण झोनमधील नागरिकांना नोटिस देण्यासोबतच ड्रोनद्वारे काढलेल्या छायाचित्रांसह नकाशाची प्रत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तसेच विवरण पत्रदेखील दिले जाईल. त्यामध्ये प्रत्येक खोलीचे मोजमाप, बाल्कनी, शौचालय, बाथरूम आदींचा समोवश राहील. यामुळे आक्षेप नोंदवताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नसल्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. नवीन प्रभागांत टप्प्या-टप्प्याने वाढहद्दवाढीमुळे मनपा क्षेत्रात सामील झालेल्या नवीन प्रभागात ‘जीआयएस’द्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नवीन प्रभागातील नागरिकांना प्रत्येक वर्षाला २० टक्के यानुसार पाच वर्षांच्या कालावधीत संपूर्ण सुधारित करप्रणाली लागू केली जाणार आहे.