लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
जिल्ह्यात प्राप्त कोविशिल्ड ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही अनेक वैद्यकीय कर्मचारी लस घेण्यास टाळत आहेत. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोविड लसीकरणाची टक्केवारी कमी दिसून येत आहे. लाभार्थींमध्ये कोविड लसीकरणाविषयी जनजागृती करून जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याचे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.
कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. या टप्प्यातील उर्वरित लाभार्थींसाठी लसीचे आणखी नऊ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी देखील नऊ हजार डोस अकोला जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले होते. कोविड लस पूर्णत: सुरक्षित असून, लाभार्थींनी कुठल्याही अफवेकडे लक्ष देऊ नये.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला.