शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंधत्वावर मात करणारी दृष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:17 IST

प्रज्ञाचक्षूंनी तयार केल्या आठ हजार राख्या!

राम देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील ‘क्षितिज’ अंध-अपंग विरंगुळा व पुनर्वसन केंद्राच्या प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांनी यंदा आठ हजार राख्या तयार केल्या आहेत. अंधत्वावर मात करणारी त्यांची ही दृष्टी नक्कीच सर्वसामान्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाºया या संस्थेत अकोल्यासह अन्य काही जिल्ह्यातील आठ-दहा प्रज्ञाचक्षु विद्यार्थी आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न करणाºया या विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरेल अशी डोळस किमया करून दाखविली आहे.नागेश उपरवट, सिद्धार्थ उके, अनिकेत सोळंके, सागर भोपळे, गणेश मोहे, प्रशांत पाखरे, दुर्गा गवई, उमा राठी व मोनिका पळसुकर अशी या विद्यार्थ्यांची नावे असून, कुणी बीए प्रथम वर्षाला, कुणी द्वितीय तर कुणी तृतीय वर्षाला; कुणाचा तबला क्लास तर कुणाचा संगीत क्लास असा शैक्षणिक प्रवास सुरू आहे. दररोज महाविद्यालयांतील उपस्थिती आणि अभ्यास हा दिनक्रम सांभाळून या सर्वांनी शेकडो प्रकारच्या आठ हजार राख्या तयार केल्यात. विशेषत: मोती, क्रिस्टल्स आणि विविध प्रकारचे मणी रेषमी दोºयात ओवून तयार करण्यात आलेल्या या राख्यांचे बाजारपेठेतील स्पर्धेला अनुसरून पॅकिंग करण्यात आले आहे. यासोबतच या विद्यार्थ्यांनी ‘राखी स्पेशल चॉकलेट्स’ व ‘बुक मार्क्स’ तयार केले आहे.शिक्षण सुरू असताना, अर्थार्जन करण्यास पुरक ठरणाºया या उपक्रमाला बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २८ व २९ जुलै रोजी शाळेत लावण्यात आलेल्या स्टॉलवर अक्षरश: विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. गुरुवार, ३ आॅगस्ट रोजी जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातसुद्धा या राख्या विक्रीसाठी उपलब्ध  राहणार आहेत. प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला मूर्तरूप देण्यासाठी संस्थेच्या संचालिका मंजुश्री कुळकर्णी व गोविंद कुळकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले, तर कुटुंबातील सदस्य कीर्ती कुळकर्णी, वयोवृद्ध कुसुमताई कुळकर्णी, प्रमिला कुळकर्णी यांचासुद्धा मोलाचा हातभार लागला.