शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथे ४0 लाखाचा तूर डाळीचा साठा जप्त

By admin | Updated: October 26, 2015 02:13 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, जिल्हय़ात प्रथमच तूर डाळ केली जप्त.

अकोला - महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोलास्थित वसाहत क्रमांक ४ मधील मॉ वैष्णवी दाल मिलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा घालून सुमारे ४0 लाख रुपयांच्या तूर डाळीचा साठा जप्त केला. जिल्हय़ात प्रथमच तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने लालचंद वीरवाणी व विनीत अग्रवाल यांच्या मॉ वैष्णवी दालमिलवर रविवारी सकाळी छापा मारला. यावेळी अवैधरीत्या बोलविण्यात आलेल्या एम एच ३0 एबी ४१५५ क्रमांकाच्या ट्रकमधील सुमारे ४0 लाख रुपयांची ५२0 पोते तूर डाळ जप्त केली. सदर तुरीची डाळ मुंबई किंवा पनवेल या दोन ठिकाणांवरून बोलाविण्यात आल्याची माहिती चालकाने दिली. मात्र, या तूर डाळीची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली ह्यबिल्टीह्ण, ५२0 पोते तूर डाळीचे देयक, सदर डाळ कोणत्या ठिकाणावरून खरेदी करण्यात आली, या संदर्भात काहीही ठोस पुरावे नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवने यांनी हा डाळीचा साठा जप्त केला.कोणत्याही मालाची वाहतूक करताना त्याची बिल्टी व सदर बिल्टीवर चालकाची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या ४0 लाख रुपयांच्या तूर डाळीच्या साठय़ाचे कोणतेही ठोस पुरावे वीरवाणी व अग्रवाल या दोघांकडे नाहीत. त्यामुळे हा साठा जप्त करण्यात आला आहे.