अकोला : जिल्हय़ात रविवार सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून, हा पाऊस पिकांना पोषक असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्याकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. १५ व २३ जुलै रोजी पाऊस झाला. तथापि वाशिम व बुलडाणा जिल्ह्यत या पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील पेरण्यांना उशीर होत आहे. अकोला जिल्हय़ात या दोन्ही तारखेला बर्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला असून, जवळपास ७0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान, वेधशाळेने शनिवारी विदर्भात पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार पाऊस येत असला तरी या तीन जिल्ह्यात या पावसाची गती मंद आहे. या रिमझिम पावसामुळे वातावरणातील तापमान कमी झाले आहे.
अकोला जिल्ह्यात रिमझिम पाऊस!
By admin | Updated: July 28, 2014 01:54 IST