शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पंचायत समिती सभापतीपदाचा प्रभार जिल्हा परिषद कृषी सभापतींकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:34 IST

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेले अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे यांचे सदस्यत्व ...

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेले अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, रिक्त झालेल्या अकोला पंचायत समिती सभापतीपदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी शुक्रवार, १२ मार्च रोजी दिला.

गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देण्यात आलेले प्रवर्गनिहाय आरक्षण ५० टक्क्यापेक्षा जास्त झाल्याने, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन, पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी दिला. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या ‘ओबीसी’ प्रवर्गातील १४ सदस्यांचे आणि सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे तसेच अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या शिक्षण व बांधकाम आणि महिला व बालकल्याण या दोन सभापतीपदांचा प्रभार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्याकडे सोपविण्यात आहे. त्यानंतर अकोला पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिला. त्यानुसार अकोला पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होइपर्यंत सभापतीपदाचा पदभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ सांभाळणार आहेत.

कृषी सभापती सोमवारी

स्वीकारणार प्रभार!

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सोमवार, १५ मार्च रोजी अकोला पंचायत समिती सभापतीपदाचा प्रभार स्वीकारणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी सांगितले.