शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचे नवे आयुक्त अजय लहाने

By admin | Updated: September 5, 2015 01:53 IST

अधिका-यांच्या बदल्या; अमानकर महाबिजच्या व्यवस्थापकपदी.

अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती येथील तडफदार उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांना नियुक्त होण्याचे आदेश शुक्रवारी महसूल विभागाने जारी केले. येत्या सोमवारी अजय लहाने मनपात रुजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शहरातील रखडलेली विकास कामे निकाली काढण्यात मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे सपशेल अपयशी ठरले. ११ फेब्रुवारी रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार्‍या शेटे यांची अवघ्या सहा महिन्यातच शासनाने बदली केली. शेटे यांची ३१ ऑगस्ट रोजी कामठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाल्यामुळे आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सोपविण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांनी अवघ्या दोनच दिवसात मनपाच्या इत्थंभूत कामकाजाचा आढावा घेतला. यादरम्यान, रिक्त आयुक्तपदावर अमरावती येथील उपजिल्हाधिकारी (वन जमाबंदी) अजय लहाने यांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. अखेर ४ सप्टेंबर रोजी मनपाच्या आयुक्तपदी अजय लहाने यांच्या नियुक्तीचे आदेश महसूल व वन विभागाने जारी केले. प्रशासकीय वतरुळात लहाने यांची अत्यंत शिस्तबद्ध आणि तडफदार अधिकारी म्हणून ओळख असल्यामुळे महापालिकेला ते नक्कीच वठणीवर आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अकोल्यात अडीच वर्ष होते 'डीएसओ'पदी कार्यरत अजय लहाने यांनी मार्च २000 ते सप्टेंबर २00२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली होती. कर्तव्यात कसूर झाल्यास कारवाईचा दंडुका उगारण्यात ते हयगय करीत नसल्याचा अनुभव आहे. *अनिल खंडागळेसह दोन उपजिल्हाधिका-यांची बदली शासनामार्फत महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. त्यामध्ये अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) अनिल खंडागळे यांच्यासह दोन उपजिल्हाधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. नवे 'आरडीसी' म्हणून बुलडाण्याचे श्रीकांत देशपांडे तर वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) नवे महाव्यवस्थापक म्हणून येत आहेत.          निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची वाशिम येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून तर बाश्रीटाकळी येथील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी संदीप सानप यांची वाशिम येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे अकोल्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून व वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर अकोल्यातील महाबीजचे नवे महाव्यवस्थापक म्हणून येत आहेत.