शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By admin | Updated: December 6, 2014 01:03 IST

शेतक-यांना तात्काळ मदत द्या; ‘छावा’च्या नेतृत्वात शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अकोला : अत्यल्प पाऊस आणि प्रचंड घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यातील शेतक री मेटाकुटीस आला असून, अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा तसेच एकरी अनुदान देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.छावा संघटना व हजारो शेतकर्‍यांनी वसंत देसाई क्रीडांगणावरून भव्य मोर्चा काढला. मध्यवर्ती बसस्थानक चौक, खुले नाट्यगृहासमोरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्याकडील पशुधन कमी किमतीत विक्रीला काढत आहेत. तसे न केल्यास पुढील सहा महिने त्यांच्यापुढे काय मांडावे आणि आपली गुजराण कशी करावी, अशी चिंता शेतकर्‍यांना आहे. शेतकरी अशाप्रकारे प्रचंड मानसिक, आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना सरकार मात्र मदतीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, नरेगा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पाणंद व शेतरस्त्यांचा कृती आराखडा तयार करून धडक योजनेंतर्गत अंमलबजावणी करावी, शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे, सर्व शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार रुपये मदत जाहीर करावी, पुढील हंगामासाठी शेतकर्‍यांना बी-बियाणे मोफत उपलब्ध करावे, पिकांचा विमा शासनानेच काढावा, सिंचन व रस्त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, जिल्ह्यातील आमदार व खासदारांचा निधी जलव्यवस्थापनाकरिता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटना व हजारो शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या मागण्या करण्यात आल्या आहेत.