शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: July 21, 2015 01:13 IST

ग्रामपंचायत निवडणुका; शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड

अकोला: जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवारी) जिल्हय़ात ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड झाली होती. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ह्यऑनलाईनह्ण उमेदवारी अर्ज भरून, त्याची प्रत (प्रिंट) संबंधित तहसील तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करण्याची प्रक्रिया गत आठवड्यात १३ जुलैपासून सुरू झाली. सोमवार, २0 जुलै रोजी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, सोमवारी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांची ह्यऑनलाईनह्ण अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ातील सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष व इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तसेच ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत (प्रिंट) तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करण्यासाठी जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवारपर्यंत) जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात एकूण ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.