शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील क्रिकेट सट्ट्याचे कनेक्शन मंगरूळपीरपर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 03:57 IST

एकजण ताब्यात; आणखी काही सट्टेबाज अडकण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चॅम्पियन ट्रॉफीमधील इंग्लंड विरुद्ध न्युझिलंड क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना खदान पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी आणखी एकजण ताब्यात घेतला असून, त्याची चौकशी सुरू आहे. क्रिकेट सामन्यावरील सट्ट्याचे कनेक्शन मंगरूळपीरपर्यंत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले असून, आणखी काही सट्टेबाज यात अडकण्याची शक्यता आहे. दक्षतानगर संकुलमधील कृष्णा पान अ‍ॅण्ड कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानामध्ये इंग्लड आणि न्यूझीलंड संघादरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांना मिळाली. त्यांनी सामना सुरू झाल्यानंतर ते अखेरपर्यंत या माहितीची पडताळणी करीत सट्टा सुरू असलेल्या प्रतिष्ठानावर छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून सिंधी कॅम्पमधील रहिवासी संतोष आत्माराम मनवानी, महेश दयाराम अमरनानी, विक्की श्यामसुंदर गोस्वामी आणि अविनाश राजेश मेंगे या चार सट्टा माफियांचा अटक करून त्यांच्याकडून १२ हजार रोख, तीन मोबाइल, टीव्ही, सेटअप बॉक्ससह ३० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील मोहित शर्मा नामक व्यक्तीस खदान पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. क्रिकेट सट्टा प्रकरणारे कनेक्शन मंगरूळपीरपर्यंत असून, आणखी काही सट्टेबाजांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.