शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अकोला :महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने; उपमहापौरपदी राजेंद्र गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 19:04 IST

महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाल्याचे पहावयास मिळाले.

अकोला:महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना मसने तसेच उपमहापौर पदासाठी राजेंद्र गिरी यांचा विजय झाला. या दोन्ही उमेदवारांना ८० पैकी ४८ मते मिळाली. मनपाच्या मुख्य सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाल्याचे पहावयास मिळाले. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसंचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने विरोधी पक्ष काँग्रेसने एकाकी लढा दिल्याचे समोर आले.महापौर पदाच्या सोडतीत अकोला महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले होते. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मनपातील सत्ताधारी भाजपच्यावतीने महापौर पदासाठी अर्चना मसने व उपमहापौर पदासाठी राजेंद्र गिरी यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. शुक्रवारी मनपाच्या मुख्य सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली असता महापौर पदासाठी अर्चना मसने विजयी झाल्या. सभागृहात एकूण ८० नगरसेवकांपैकी भाजपचे ४८ नगरसेवक असून एका अपक्ष नगरसेविकेचा भाजपला पाठींबा होता. या निवडणुकीत भाजपची एक नगरसेविका अनुपस्थित असली तरीही अर्चना मसने यांना ४८ नगरसेवकांची मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार अजरा नसरीन मकसूद खान यांना काँग्रेसच्या सर्व १३ नगरसेवकांची मते मिळाली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका