अकोला: गेल्या पाच दिवसांपासून अधून-मधून जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसला असून, अकोला शहरात रात्री ८.३0 वाजेपर्यंत १५.0१ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. रिमझिम पाऊस सुरू असला तरी, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन, दीड महिना लोटला; मात्र पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी सुरु केली. झालेल्या रिमझिम पावसात शेतकर्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या आहेत; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात आहे. दरम्यान, शनिवारीदेखील जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला असून, सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकोला शहरात १५.0१ मि.मी.पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील हवामनशास्त्र विभागाच्या कार्यालय सूत्रांनी दिली.
अकोल्यात १५.0१ मि.मी.पाऊस
By admin | Updated: July 20, 2014 02:01 IST