शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

वादळी पावसाने अकोलेकरांची दाणादाण !

By admin | Updated: June 3, 2014 01:59 IST

घरावरील टीन उडाले, वृक्ष उन्मळून पडली, वाहतुकीला खोळंबा, वीज पुरवठा खंडित, एक जखमी

अकोला : दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पावसापेक्षा वार्‍याचा वेग अधिक असल्यामुळे सोमवारी अकोलेकरांची दाणादाणा उडाली. मुख्य डाकघराजवळील होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळून एक इसम जखमी झाला. अनेक ठिकाणी घरावरील टीन उडाले, वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडली, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला खोंळबा झाला. जुने शहरासह शहरातील इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे काळोख पसरला होता.दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू आहे. सोमवार, २ जून रोजी ४ वाजेपर्यंत ४४.४ अंश डिग्री तापमान होते. ४ वाजतानंतर अचानक ढग भरू न आले. सोसाट्याचा वारा सुटला. या वार्‍यामुळे मुख्य डाकघरासमोरील होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळल्याने विठ्ठल कांबळे जखमी झाले. रणपिसेनगरातील प्रोफेसर कॉलनीत वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतुकीला खोंळबा झाला. मोठी उमरीजवळली रेल्वे पुलाखाली प्रचंड पाणी साचल्याने या भागातील वाहतूक काहीवेळ ठप्प पडली होती. बारा ज्योर्तिलिंग मंदिरासमोर पाणी साचले होते. वृंदावननगरातील घरावरील टीन उडून खांबावर लटकले, सिव्हिल लाईन चौकातील टिनाचे शेड रस्त्यावर पडले होते. आकोट फैल, न्यू तापडियानगर या भागातील देवीच्या मंदिरासमोरील चोपडे गुरुजी यांच्या घरावरील टीन उडाले होते.

** जुने शहर काळोखात वादळी पावसामुळे जुने शहरातील वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला. शहरातील इतर भागातील वीज गायब झाल्यामुळे नगरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

** लघुउद्योजकांची त्रेधातिरपिटअचानक विजांचा कडकडाटात आलेल्या वादळीपावसामुळे फेरीवाले, लघुउद्योजकांची चांगलीच धांदल उडाली, वादळामुळे अनेकांचे नुकसान झाले.

** वातावरणात गारवाअचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्यामुळे अस‘ उकाड्यातून नागरिकांना हायसे वाटले. दरम्यान, मंगळवार व बुधवारी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.