शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या परिसरात बहरली डिकामली!

By admin | Updated: July 18, 2016 02:07 IST

बाळाचे दात मजबूत करण्यासाठी तसेच पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणून डिकामलीचा होतो वापर.

अकोला: लहान मुलांचे दात बळकट करायचे किंवा सर्वांच्याच पोटाचे विकार बरे करायचे असतील तर त्यावर डिकामली हे रामबाण औषध. अँलोपॅथीच्या जमान्यात आजही ग्रामीण, अतिदुर्गम भागात डिकामलीचा वापर होतोय तो औषध म्हणूनच. जुलै महिन्यात दिसणारे याच डिकामलीचे झाड पांढर्‍या फुलांनी बहरले असून, या झाडाचे दर्शन आपणास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर बघायला मिळते.या कृषी विद्यापीठाच्या शेळी, मेंढी संगोपन प्रकल्पांतर्गत एका कडेला एकाच जातीची ओळीने १५,१६ झाडे आहेत. वर्षाऋतू सोडला तर या झाडांकडे कोणी ढुंकून पाहत नाही; पण जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या प्रारंभी ही झाडे शुभ्र फुलांनी बहरतात आणि तेथून जाणार्‍यांचे लक्ष वेधतात, तसेच या फुलांचा मादक सुगंध प्रात:काळी फेरफटका मारणार्‍यांना धुंद करतो. सध्या ही झाडे अशीच मस्त बहरली आहेत. त्यांची ओळख करून घेतल्यानंतर त्यांचे मनोगत मनाला आनंददायी, सुखद आणि वेड लावणारे आहे.डिकामली निसर्गत: डोंगराळ भागात आढळते. १५ ते १६ फुटांचे उंच हे झाड वाढते. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाचा अभ्यास करू न डिकामली मानवाच्या किती उपयोगी आहे, हे सांगितलेले आहे.पोटदुखीवर रामबाण उपाय!माणसाला जिभेचे चोचले पुरविताना खायचे भान राहात नाही. मग अजीर्ण, कृमी, जंत, असे अनेक पोटाचे विकार होतात. त्यासाठी डिकामलीच्या खोडातून येणारा, कोवळ्य़ा पानातून स्रवणारा तीव्रगंधी डिंक जर सेवन केला तर पोटदुखी व तत्सम आजारात आराम पडतो, तसेच तोंडल्यासारखी फळेही या झाडापासून मिळतात. त्यातून पिवळ्य़ा रंगाचा चीक येतो. तो वाळवून लहान मुलांच्या हिरड्यांना लावल्यास बाळाचे दात बळकट होतात.