शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘सहकार’

By admin | Updated: September 9, 2015 01:58 IST

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; शेतकरी पॅनलचा पराभव.

अकोला: अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. शेतकरी पॅनलच्या उमेदवारांचा सर्वच १५ जागांवर पराभव करीत सहकार पॅनलने सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राखले. मंगळवारी खदान परिसरातील शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी करण्यात आली. जिल्हय़ातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यामध्ये सेवा सहकारी मतदारसंघातून २८, ग्रामपंचायत मतदारसंघातून ११, व्यापारी व अडते मतदारसंघातून ५ आणि हमाल व मापारी मतदारसंघातून २ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या निवडणुकीत सहकार गटाचे शिरीष वसंतराव धोत्रे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), राजेश अवचितराव बेले (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), बाबूराव रामभाऊ गावंडे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), अभिमन्यू शंकर वक्टे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), ज्ञानेश्‍वर नागोराव महल्ले (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), विठ्ठल प्रल्हाद चतरकर (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), देवेंद्र हरिभाऊ देवर (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण), वर्षा गणेश गावंडे (सेवा सहकारी संस्था महिला), विद्या गजानन गावंडे (सेवा सहकारी संस्था महिला), नीळकंठ शालीग्राम खेडकर (सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग), प्रमोद रामकृष्ण लाखे (सेवा सहकारी संस्था भटक्या जाती/जमाती), अर्चना मुकेश मुरूमकार (ग्रामपंचायत सर्वसाधारण), शिवहरी ऊर्फ सुनील देवीदास परनाटे (ग्रामपंचायत सर्वसाधारण), संदीप शालीग्राम पळसपगार (ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती), मंदाकिनी गजानन पुंडकर (ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या १५ उमेदवारांनी विजय संपादन केला. तसेच अडते व व्यापारी मतदारसंघातून चंद्रशेखर रामभाऊ खेडकर, रमेशचंद्र शिवरतन चांडक, हमाल व मापारी मतदारसंघातून चंदू छोटू चौधरी यांनी वियज मिळविला.