शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या तपासणीनंतरही डेपोतील परिस्थिती जैसे थे

By admin | Updated: September 25, 2015 01:05 IST

एसटी डेपोची पुन्हा तपासणी आवश्यक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या नोटीसवर अहवाल सादर.

अकोला: औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या नोटीसला उत्तर देत एसटी महामंडळाने डेपोचा तपासणी अहवाल सादर केला आहे. परंतु, अहवाल सादर केल्यानंतरही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने अद्यापही महामंडळाच्या कामगारांचा जीव धोक्यात आहे. महाराष्ट्र राज्य फॅक्ट्री अँक्टनुसार कारखान्यांमध्ये कार्यरत कामगारांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. एसटी महामंडळाचा डेपो या अँक्टमध्ये मोडत असल्याने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कर्मचार्‍यांना पुरविण्यात येणार्‍या सुरक्षा व आरोग्यविषयक सुविधांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान कर्मचार्‍यांची सुरक्षा व आरोग्य धोक्यात असल्याचे उघडकीस आले. या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागामार्फत एसटी महामंडळाला नोटीस बजावण्यात आली होती. एसटी महामंडळाने त्वरित तपासणीचा अहवाल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे सादर केला. परंतु, अहवाल सादर केल्यानंतरही डेपोमध्ये जैसे थे परिस्थिती कायम आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या डेपोमधील कॉम्प्रेसरची तपासणी गत अनेक वर्षांपासून करण्यात आली नव्हती. महामंडळाच्या अहवालानुसार त्याची तपासणी करण्यात आली आहे. परंतु, वास्तविकतेत येथील कॉम्प्रेसर अद्यापही कामगारांसाठी धोकादायक असल्याचे कामगारांनी सांगितले. तसेच वेल्डिंग करताना सुरक्षेसाठी आवश्यक सेफ्टी ग्लासदेखील नसल्याने हा प्रकार कामगारांसाठी धोकादायक ठरत आहे. जुने बसस्थानकाच्या डेपोमध्येही कामगारांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या डेपोची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे.