शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतर गुटख्याचे भाव दामदुप्पट!

By admin | Updated: July 19, 2016 01:53 IST

गुटखा माफियांची अजब शक्कल; पोलिसांशीही लागेबांधे.

अकोला: प्रतिबंधित गुटख्याच्या साठय़ावर पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर गुटख्याची छुप्या मार्गाने होणारी वाहतूक कमी न करता उलट गुटख्याचे दाम पोलिसांच्या नावाने दुप्पट करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती उघड झाली आहे. गुटखा माफियांशी पोलिसांचे लागेबांधे असून यामधूनच माफियांनी ही नवी शक्कल वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली.अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने तीन महिन्यांपूर्वी पारस येथे गुटख्याचा ट्रक पकडून सुमारे ५0 लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर याच पथकाने एमआयडीसीमध्ये असलेल्या एका गोदामावर छापा मारून सुमारे ४0 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत जप्त केल्याने गुटखा माफियांचे कंबरडे मोडल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या; मात्र गुटखा माफियांनी पोलीस कारवाईचा बाऊ करीत १00 रुपयांना असलेले गुटख्याचे पाकीट तब्बल १७0 ते १८0 रुपयांना विक्री करणे सुरू केले. ५0 लाख रुपयांचा हा फटका भरून काढण्यासाठी गुटखा माफियांना गत तीन महिन्यांपासून मोठय़ा जोमात कारभार सुरू केला आहे. विमल गुटख्यावरच सुरू असलेला अकोल्याचा कारभार आता सितार, काली बहार, पान बहार, १२0/३00 चा गुटखा, सुगंधित सुपारी आणि गोवा या गुटख्याचीही आवक मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहे. या माध्यमातून पुन्हा गुटख्याच्या गोरखधंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू झाली असून याकडे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस आता डोळेझाक करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांना सोबत घेऊन कारवाईचा धडाका सुरू केल्यास गुटखा माफियांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानेही तातडीने कामाला लागण्याची गरज आहे. गुटखा माफियांनी प्रत्येक पोलीस स्टेशनशी ह्यअर्थह्णपुर्ण संबंध जोपासल्याने पोलीस अधीक्षक मीणा यांच्या पथकाने कारवाया केलेल्या आहेत; मात्र त्यानंतर आता कारवाई थंड बस्त्यात असून पोलीस अधीक्षकांनी ठाणेदारांचे कान टोचल्यास आणखी गुटख्याचा साठा जप्त केल्या जाऊ शकतो.