शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर...चतारी ग्रामीण रुग्णालयात लवकरच सुरू होणार कोविड सेंटर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी ...

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्राद्वारे दिले आहेत.

चतारी येथे ग्रामीण रुग्णालय परिसरातील ३५ ते ४० गावांतील रुग्ण उपचारासाठी दररोज येतात. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. परिसरातील रुग्णांना उपचारासाठी अकोला, पातूर येथे जावे लागते. लॉकडाऊनमुळे बस व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने रुग्णांना अडचण निर्माण होत होती. रुग्णांना वेळेवर तत्काळ उपचार मिळावा, यासाठी बाळापूर मतदारसंघातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी चातारी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे रेटून धरली होती. बळीराम सिरस्कार यांची मागणीला यश मिळाले असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना चतारी येथे ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश पत्राद्वारे दिली आहे. तसेच बळीराम सिरस्कार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा सुद्धा केली, येत्या आठवडाभरात कोविड सेंटर सुरू करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी सिरस्कार यांना दिले आहे. त्यामुळे परिसरातील ३५ ते ४० गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

-----------------------------

रुग्णांची अडचण लक्षात घेत चतारी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. राजेश टोपे यांनी मागणीला हिरवी झेंडी देऊन कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

बळीराम सिरस्कार, माजी आमदार