शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीतील केवळ ४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: December 9, 2015 02:54 IST

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ८ कोटींची कामे रेंगाळली.

संतोष येलकर/अकोला : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हय़ातील सात आमदारांसाठी सन २0१५-१६ या वर्षात १२ कोटी ७६ लाख ९६ हजारांचा निधी शासनामार्फत उपलब्ध झाला. उपलब्ध निधीपैकी ८ डिसेंबरपर्यंत केवळ ४ कोटी ३0 लाख ९४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ८ कोटी ४६ लाख २ हजार रुपयांच्या निधीतील कामे अद्याप रेंगाळली असून, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत ही कामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत दरवर्षी प्रत्येक आमदारास दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सन २0१५-१६ या वर्षात जिल्हय़ातील सात आमदारांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत गत २३ एप्रिल रोजी १२ कोटी ७६ लाख ९६ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधीचा (फंड) समावेश आहे. सातही आमदारांसाठी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीपैकी ८ डिसेंबरपर्यंत ४ कोटी ३0 लाख ९४ हजार रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ८ कोटी ४६ लाख २ हजार रुपयांच्या निधीतील कामांना अद्याप प्रशासकीय मिळणे बाकी आहे. आमदार फंडातील विकासकामे येत्या मार्च अखेरपर्यंत करण्यास केवळ तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील सातही आमदारांच्या फंडातील ८ कोटी ४६ लाख २ हजार रुपयांच्या निधीतील रेंगाळलेली कामे तीन महिन्यांच्या कालावधीत मार्गी लागणार की की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.*आमदार निधीतून करावयाची कामे!आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीतून आमदारांच्या मतदारसंघात रस्ते, नाल्या, विंधन विहिरी, व्यायामशाळांना साहित्य वाटप, स्मशानभूमी आवारभिंत, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी कामे करण्यात येतात.