शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात कांदाचाळ प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: November 5, 2015 01:58 IST

लाभार्थींना मिळणार प्रकल्प खर्चाच्या ५0 टक्के अनुदान.

अकोला: कांदा पिकाच्या काढणीनंतरचे आयुष्य व गुणवत्ता वाढविण्यासाठी कांदाचाळ उभारणी योजनेला राज्यातील शेतकर्‍यांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षात हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत कांदाचाळ हा प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी १८ जून २0१५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. काढणीपश्‍चात व्यवस्थापन घटक अंतर्गत कांदाचाळ उभारणी या बाबीचा समावेश असून, या घटकांद्वारे कांदा पिकाची शास्त्रीयदृष्ट्या साठवणूक करून, त्याचे काढणीनंतरचे आयुष्य व गुणवत्ता वाढविता येते तसेच ग्राहकांना सातत्यपूर्ण चांगल्या दर्जाचा कांदा पुरवठा करता येतो व शेतकर्‍यांनाही कांदा पिकासाठी रास्त बाजारभाव मिळणे शक्य होते. यामुळे राज्यभरात कांदाचाळ प्रकल्पास शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता, शासनाने वर्ष २0१५-१६ मध्ये हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली. लाभार्थींना मिळणार प्रकल्प खर्चाच्या ५0 टक्के अनुदान या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थींना कांदाचाळ बांधण्यासाठी येणार्‍या खर्चाच्या ५0 टक्के किंवा कमाल ३५00 रुपये प्रति मे. टन याप्रमाणे २५ मे. टन क्षमतेपर्यंतच्या चाळीसाठी जास्तीत जास्त 0.८७५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल. हे अर्थसाहाय्य बँक कर्जाशी निगडित राहील. सदर प्रकल्प, वर्ष २0१५-१४ मध्ये मंजुरी मिळालेल्या, परंतु अनुदानाअभावी प्रलंबित असलेल्या तसेच वर्ष २0१५-१६ मध्ये नव्याने उभारणी करण्यात येणार्‍या कांदाचाळ प्रस्तावांना लागू राहील. सक्षम प्राधिकारी यांनी कांदाचाळींची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर तसेच प्रलंबित कांदाचाळ प्रकल्पांना यापूर्वी अनुदान देण्यात आलेले नाही, याची खात्री केल्यानंतर या कांदाचाळ प्रकल्पांना अनुदान देय राहील.