शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

प्रशासन गुंतले निवडणुकीच्या कामात; वाळूची अवैध वाहतूक जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:26 IST

शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या महसुलास चुना लागत असून, वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची चांगलीच चांदी होत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याची संधी साधून जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. त्यामुळे वाळूच्या स्वामीत्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या महसुलास चुना लागत असून, वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची चांगलीच चांदी होत आहे.जिल्ह्यात गतवर्षी ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावाची मुदत गत ३० सप्टेंबरला संपली असून, यावर्षी जिल्ह्यात ६० वाळू घाटांचा लिलाव प्रस्तावित असून, लिलाव प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. महसूल विभागाचे अधिकारी -कर्मचारी आणि तालुकास्तरावरील भरारी पथके निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून, जिल्ह्यातील वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. वाळू घाटांचा लिलाव झालेला नसताना वाळूचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने, वाळूच्या स्वामीत्वधन शुल्कापोटी शासनाच्या खात्यात जमा होणाºया महसुलास चुना लागत आहे, तर दुसरीकडे वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची मात्र चांगलीच चांदी होत आहे.पथकांचा तपासणीकडे कानाडोळा!जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाला नसताना, वाळू घाटांमधून मात्र वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या महसूल विभागाच्या तालुकास्तरावरील भरारी पथकांकडून वाळूची अवैध वाहतूक करणाºया वाहनांच्या तपासणीकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे.

मान्सून पश्चात वाळू घाटांचे सर्वेक्षण रखडले!जिल्ह्यातील नदी-नाल्यांमध्ये पाणी असल्याने, जिल्ह्यात मान्सून पश्चात वाळू घाटांचे सर्वेक्षण रखडले आहे. त्यामुळे यावर्षी लिलाव करण्यासाठी जिल्ह्यातील वाळू घाटांची संख्या अद्याप निश्चित करण्यात आली नाही; यावर्षी जिल्ह्यात ५८ ते ६० वाळू घाटांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गतवर्षी करण्यात आलेल्या वाळू घाटांच्या लिलावाची मुदत गत ३० सप्टेंबरला संपली असून, यावर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव होणे बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात होत असलेली वाळूची वाहतूक अवैध आहे. वाळू घाटांचे मान्सून पश्चात सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्यात येणार आहे.-डॉ.अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू