शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तालुका-जिल्हास्तरावर तयार होणार कृती आराखडा!

By admin | Updated: December 27, 2014 23:46 IST

जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी.

संतोष येलकर/ अकोला: राज्यातील टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्हा आणि तालुकास्तरावर कामांचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आणि ५२ टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील २२ जिल्ह्यांमधील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झालेल्या गावांमध्ये प्राधान्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची गरज आहे; तसेच भविष्यात राज्यातील उर्वरित भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी टंचाई परिस्थितीवर मात करण्याकरिता राज्यातील सर्वच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास शासनाच्या गत ५ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समन्वय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांची आणि कामांची निवड करून, जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे; तसेच उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समित्यांमार्फत सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तालुकास्तरीय आराखडा तयार करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचा तालुकास्तरीय कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्पष्ट केले.