शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

नियमांचे पालन न करणार्‍या कंपन्यांवर कारवाई

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

अकोला मनपाच्या नोटीसकडे मोबाईल कंपन्यांची पाठ

अकोला: मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली. त्यानुसार मनपाच्या नगर रचना विभागाने शहरात अधिकृत व बेकायदेशीर टॉवर उभारणार्‍या मोबाईल कंपन्यांना नोटीस जारी केल्या. परवान्याचे नूतनीकरण करताना नवीन निकषामुळे मोबाईल कंपन्यांच्या नाकीनऊ आले आहेत. नगर रचना विभागाला अधिकृत ७0 मोबाईल टॉवरपैकी फक्त २२ टॉवरचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातही प्रचंड त्रुट्या आहेत. शासन निर्णयाच्या लवचिक धोरणाचा कंपन्या फायदा घेत असल्यामुळे कंपन्यांनी मनपाच्या नोटीसकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.मोबाईल टॉवर उभारण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण निश्‍चित केले आहे. यापूर्वी शहरात मोबाईल कंपन्यांनी मनमानी पद्धतीने टॉवर उभारले. खासगी जागा, व्यावसायिक संकुल असो वा रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारताना मंजुरीसाठी नगर रचना विभागाच्या जुजबी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. इमारत मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनाकडे सादर केल्यावर अत्यल्प शुल्काची आकारणी करीत प्रशासनाने टॉवर उभारण्याला परवानगी दिली. विविध मोबाईल कंपन्यांनी मनपाच्या लवचिक धोरणाचा फायदा घेत, प्रशासनाकडे टॉवर उभारण्यासंदर्भात अधिकृतपणे नोंदणीच केली नसल्याचे समोर आले. शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या ११५ मोबाईल टॉवरपैकी फक्त ७0 टॉवरलाच मनपा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली. संबंधित कंपन्यांनी दरवर्षी मोबाईल टॉवरचे नूतनीकरण व परवाना मिळवण्यासाठी शासनाने जारी केलेल्या निकषानुसार प्रस्ताव सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार मनपाने अधिकृत व बेकायदेशीर असलेल्या मोबाईल टॉवरच्या संबंधित कंपन्यांना नोटीस जारी केल्या. ११५ पैकी फक्त २२ कंपन्यांचे प्रस्ताव मनपाला प्राप्त झाले असून, त्यातही प्रचंड त्रुट्या असल्याची माहिती आहे. *निकषांमुळे कंपन्यांचा आखडता हातमोबाईल टॉवर उभारण्यासाठी शासनाने जारी केलेली नियमावली कंपन्यांना डोईजड ठरत आहे. मोबाईल टॉवर उभारणीसाठी महाराष्ट्र रिजनल अँन्ड टाऊन प्लॅनिंग अँक्ट (एमआरटीपी), १९६६ (कलम ४४ ते ४७) अन्वये नगर रचना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये इमारतींच्या नकाशांना जशी परवानगी घेतली जाते, त्याच पद्धतीने मोबाईल टॉवरची परवानगी घ्यावी लागेल. याकरिता टॉवरची जागा, इमारतीचा नकाशा मनपाकडे जमा करावा लागेल. इमारत टॉवरचा भार पेलण्यास सक्षम आहे, हे सिद्ध करणारा स्ट्रक्चरल ऑडिटरचा रिपोर्ट द्यावा लागेल. तसेच इमारतीमधील ७0 टक्के कुटुंबांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. *स्थानांतरणाशिवाय पर्याय नाही!मोबाईल कंपन्यांनी ज्या इमारतींवर टॉवर उभारले आहेत, त्या इमारतींचे ह्यकम्पिलशन सर्टिफिकेटह्ण सादर करावे लागणार आहे. अर्थातच, शहरात इमारतींचे बांधकाम नियमानुसार नसल्यामुळे सदर प्रमाणपत्र देणे कंपन्यांना शक्य नाही. अशास्थितीत स्थानांतरणाशिवाय मोबाईल कंपन्यांना पर्याय नाही. यामुळे इमारतीपेक्षा खुला भूखंड मिळवण्यासाठी कंपन्यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.