शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रुजू न होणा-या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतरही ते रुजू होत नसल्यास त्यांच्यावर ७ आॅगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हा निर्णय असला तरी अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांना गेल्या महिनाभरापासून पदस्थापनाच देण्यात आली नाही, हे विशेष.आंतरजिल्हा बदलीने राज्यातील जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतरही ते रुजू होत नसल्यास त्यांच्यावर ७ आॅगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हा निर्णय असला तरी अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांना गेल्या महिनाभरापासून पदस्थापनाच देण्यात आली नाही, हे विशेष.आंतरजिल्हा बदलीने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबतच्या सूचना ७ जुलै, ३१ जुलै २०१७ रोजीच्या पत्रांतून दिल्या आहेत. त्यानुसार  शिक्षण विभागाने कार्यवाही करणे आवश्यक होते; मात्र त्यानंतर महिनाभरातही आवश्यक ती माहिती न जुळवल्याने शिक्षकांना पदस्थापना आणि रुजू होण्यापासून रोखले जात आहे.  पहिल्या टप्प्यात शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इतर जिल्ह्यांतून येणाºया शिक्षकांच्या आदेशाचा भडिमार सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्यासाठी ५० पेक्षाही शिक्षकांचे आदेश आहेत. त्या शिक्षकांना समुपदेशनातून पदस्थापना देण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले. समुपदेशनातून पात्र ठरणाºया शिक्षकांना योग्य जागी पदस्थापनेसाठी माहिती उपलब्ध नसल्याने काही शिक्षकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी माहिती तयार करून पदस्थापना देण्यासाठी मंगळवारी पुन्हा शिक्षकांना बोलावले.गरोदर, स्तनदा मातांना प्रथम प्राधान्यआंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना शिक्षिकांपैकी गरोदर, स्तनदा मातांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या पसंतीच्या जागेवर पदस्थापना देण्याचे बजावण्यात आले आहे. त्यासोबतच संवर्ग-१ मधील शिक्षकांची पदस्थापना करणे, त्यामध्ये दुर्धर आजारी, पाल्य गतिमंद असणे, दिव्यांग यांचा समावेश आहे. संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, त्यांच्या गावातील अंतराची मर्यादा याबाबतची माहिती तर संवर्ग-३ मध्ये असलेल्य सर्वसाधारण शिक्षकांना उर्वरित ठिकाणी पदस्थापना दिली जाणार आहे.पदस्थापनाच नाही, तर कारवाई कुणावर...?शासनाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिल्यानंतर रुजू न झालेल्या शिक्षकांना ७ आॅगस्ट रोजी निलंबित करण्याचे सांगितले आहे. अकोला जिल्ह्यात शिक्षकांना  पदस्थापनाच दिली नाही तर ते रुजू कसे होणार, त्यामुळे सोमवारी कुणावर कारवाई करणार, हा पेच आहे. शिक्षक रुजू न झाल्यास कारवाई, त्याचवेळी रुजू करून न घेणे, पदस्थापना न देणाºया जिल्हा परिषद प्रशासनाचे काय करावे, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.