शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ९७.९४ कोटींची मदत

By admin | Updated: August 17, 2014 01:29 IST

पीक विमा मुदत वाढवून मिळावी, राज्य शासन केंद्र सरकारकडे करणार मागणी- उप मुख्यमंत्री अजित पवार.

वाशिम : जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ९७.९४ कोटी रुपये राज्य शासनाकडून देण्यात आले असून, त्यातून आतापर्यंंंत ५८ कोटी ५९ लाख ८२ हजार रुपयांचे शेतकर्‍यांना वाटप झाल्याची माहिती उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाशिमचे पालकमंत्री मनोहरराव नाईक, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश डहाके, प्रभारी जिल्हाधिकारी एल.जी. राऊत, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने टंचाई आराखडा तयार करावा, असे आदेश देऊन तात्पुरत्या टंचाई निधी वाशिमसाठी तत्काळ देण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात येतील, असेही पवार यांनी सांगितले. वैरण विकासासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यानी यावेळी दिले. वाशिमसाठी यावर्षी वार्षिक सर्व साधारण योजनेसाठी ८५ कोटी रुपये दिले. हवामानावर आधारित पीक विमा योजना राज्यातील ८ जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात असून, असा प्रयोग राज्यात आणि देशातही पहिल्यांदाच होत असल्याचे उप मुख्यमंत्र्यानी यावेळी आवर्जुन सांगितले. अजूनही राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे अजून पीक विमा मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती राज्य शासन केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही उप मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.