शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-यांकडून ९0 हजारांची वीजचोरी!

By admin | Updated: November 20, 2015 02:42 IST

अकोला येथे भरारी पथकाची दोन व्यापा-यांवर कारवाई.

अकोला : व्यावसायिक वापरणासाठी असलेल्या विद्युत जोडणीच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करून तब्बल ९0६५0 रुपयांची वीजचोरी करणार्‍या येथील दोन व्यापार्‍यांवर महावितरणच्या अकोला येथील भरारी पथकाने गुरुवारी कारवाई केली. स्थानिक दाना बाजार फीडर अंतर्गत येणार्‍या परिसरात वीजचोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अकोला येथील भरारी पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, भरारी पथकाने दोन दिवसांपासून या परिसरात शोध मोहिम राबविली. गुरुवारी दोन व्यापारी प्रतिष्ठानांमधील विद्युत मीटरची तपासणी केली असता, तेथे वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या पथकातील अधिकार्‍यांच्या लक्षात आले. तपास केल्यानंतर मीटरमध्ये तांत्रिक बदल करून मेसर्स अमृत स्टोर्स (वीज वापरकर्ता मन्सूर अली वाघ) यांच्याकडे ४२,६२0 रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. तसेच हाजी मुसा अयूब (वीज वापरकर्ता दीपक छगनलाल मकवान) यांच्याकडे ४७६३0 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. एकूण ९0२५0 रुपयांची वीजचोरी या कारवाईदरम्यान पकडण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली. या व्यापार्‍यांकडून होत असलेल्या वीजचोरीची रक्कम दंडासह वसूल केली जाणार आहे. व्यापार्‍यांनी दंडासह रक्कम न भरल्यास पोलीस कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाविरणच्या अधिकार्‍यांनी दिली.

*आकोटमध्येही कारवाई

अकोला मंडळाअंतर्गत येणार्‍या आकोट उपविभागातही महावितरण आणि भरारी पथकाने वीजचोरीचे प्रकार शोधण्यासाठी मोहीम राबविली. आकोटमध्ये वीजचोरी करणार्‍या ग्राहकांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती आहे. मात्र,याबाबतचे तपशील रात्री उशिरापर्यंंत महावितरणतर्फे देण्यात आले नाही.

*दोन दिवसांपासून शोध मोहीम

अकोला मंडळाअंतर्गत वीजचोरीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि भरारी पथकाने संयुक्त मोहीम राबविली आहे. दोन दिवसांपासून शहरात ही धडक मोहीम राबविली जात आहे. शहरातील सर्वच परिसरात वीजचोरीचे प्रकार शोधण्यासाठी ही मोहीम आणखी काही दिवस राबविली जाणार आहे. आतापर्यंंत ८0 पेक्षा अधिक वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १0 ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळून आले.