शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सिंचन कामांचा ९४ कोटींचा आराखडा रखडला!

By admin | Updated: December 1, 2014 00:35 IST

मंजुरीची प्रतीक्षा : कोल्हापुरी-सिमेंट नाला बंधा-यांची २00 कामे प्रस्तावित.

संतोष येलकर /अकोलाजिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधार्‍यांसह नाला सरळीकरणाच्या ९४ कोटी ६७ लाख ८५ हजारांच्या नवीन सिंचन कामांचा आराखडा जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. कृती आराखड्यात प्रस्तावित २00 कामांचा हा आराखडा लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या नागपूर येथील मुख्य अभियंत्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, या आराखड्याला मंजुरी मिळण्याची चार महिन्यांपासून प्रतीक्षा सुरु आहे.विदर्भातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनामार्फत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत विविध गावांमध्ये २५0 हेक्टर सिंचन क्षमतेची नवीन कोल्हापुरी बंधारे, सिमेंट नाला बंधारे व त्यासाठी नाला सरळीकरणाच्या कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत तयार करण्यात आला. जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोला, बाश्रीटाकळी, आकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या सातही तालुक्यात सिंचनाची नवीन २00 कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९४ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नवीन सिंचनाच्या कामांचा हा आराखडा जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत चार महिन्यांपूर्वी शासनाच्या लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागाच्या नागपूर येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यात नवीन कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे व त्यासाठी नाला खोलीकरणाची कामे सुरू होतील. नवीन सिंचन कामांच्या या आराखड्यास मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यास गती मिळणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील २00 सिंचन कामांचा समावेश असलेल्या या कृती आराखड्यास मुख्य अभियंत्यांकडून केव्हा मंजुरी मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.