शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ साठी ८५ कोटींचा आराखडा!

By admin | Updated: June 9, 2017 03:50 IST

१४४ गावांमध्ये कामे प्रस्तावित; जिल्हास्तरीय समितीची मंजुरी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णच्या कामांसाठी ८५ कोटी रुपयांच्या आराखड्याला गुरुवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील १४४ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यांच्या आधारे जिल्ह्यातील कामांचा आराखडा निश्चित करण्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील १४४ गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी ८५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. आराखड्यातील मंजूर प्रस्तावित ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे पावसाळा संपल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभ्२ााष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम यांच्यासह जलसंधारण, पाटबंधारे, लघुसिंचन (जलसंधारण), वन विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन, पाणीपुरवठा व रोहयो विभाग इत्यादी यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचा जिल्हास्तरीय आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, बंधारे, ढाळीचे बांध, शेततळे, खोदतळे, समतल चर, ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत शेततळ्यांची कामे प्रस्तावित आहेत.