शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

‘फिट इंडिया’त जिल्ह्यातील ७५५ शाळा ‘अनफिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:18 IST

अकोला : फिट इंडिया मोहिमेंतर्गत वाशिमसह राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ...

अकोला : फिट इंडिया मोहिमेंतर्गत वाशिमसह राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून ५९.५० टक्के शाळांची नोंदणी झाली असून, ७५५ शाळांची नोंदणी होणे बाकी आहे. शाळांकडून नोंदणी करण्याचे काम सुरू असून, नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने शिक्षक वैतागले आहेत.

मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र शासनाने फिट इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सृदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळा स्तरावर घेऊन विद्यार्थ्यांची मूल्यमापनविषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे भरण्यात यावी, आदी उद्देश यशस्वी व्हावे, याकरिता फिट इंडिया मोहिमेंतर्गत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तसेच खेलो इंडियाच्या अ‍ॅपवर पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकाला नोंदणी करणे आवश्यक आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी या कामासाठी एका सहायक शिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे संचालक राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आहेत. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या शारीरिक शिक्षकांची संख्या फार कमी असून, २८ डिसेंबर २०२० ही अंतिम मुदत आहे. दुसरीकडे शाळांची नोंदणी करण्यासाठी २७ डिसेंबर अशी अंतिम मुदत आहे. आतापर्यंत १८६४ पैकी ११०९ शाळांची नोंदणी झाली असून, ७५५ शाळांची नोंदणी अद्याप बाकी आहे.

नोंदणी करण्यासाठी येतात तांत्रिक अडचणी

नोंदणी करण्यासाठी शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिलेल्या आहेत; याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित ‘लिंक’ पाठविण्यात आली; परंतु लिंक ओपन होत नसल्याच्या तक्रारी अनेक शाळा व शिक्षकांनी केल्या. नोंदणीत तांत्रिक अडचणी येत आहेत.

फिट इंडिया मोहिमेंतर्गत शाळा व शारीरिक शिक्षकांनी नोंदणी करण्यासंदर्भात जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील शाळा नोंदणी करीत असून, दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.

- दिनकर उजाडे,

जिल्हा क्रीडा अधिकारी.