शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार ३४0 जागांसाठी प्रवेश!

By admin | Updated: May 23, 2017 01:15 IST

५२ विज्ञान महाविद्यालयांचा समावेश: शिक्षण शुल्काची माहिती देण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विज्ञान शाखा असलेल्या ५२ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ७ हजार ३४0 जागांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असून, त्यासंबंधीची नियमावली तयार करण्याचे काम शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. शहरातील ५२ कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या शिक्षण शुल्काची माहिती देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत. शहरात यंदा प्रथमच केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने, माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दरवर्षी प्रवेशासाठी झुंबड उडते. त्यासाठी विद्यार्थ्यांची टक्केवारी बघितली जात होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कमी टक्केवारीमुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात डोनेशनसुद्धा उकळल्या जात होते; परंतु आता याला ब्रेक बसणार असल्याने कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध दर्शविला आहे; परंतु शिक्षण विभागाने कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने शहरातील विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काची माहिती मागविली आहे. यासोबतच बायोफोकल, द्विलक्षी अभ्यासक्रम, जनरल सायन्स या विषयांचीसुद्धा माहिती मागविली आहे. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून, त्याचे काम सुरू आहे. प्रवेशासाठी कॉम्पुटर सेंटरची निवड होणार अकरावीची केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले असून, ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शहरातील पाच ते सहा कॉम्पुटर सेंटरची निवड करण्यात येणार आहे. येथून प्रवेश अर्जांची विक्री करण्यात येईल आणि या ठिकाणीच विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज करावे. त्यासाठी शुल्क आकारण्यात येईल. अद्याप कॉम्पुटर सेंटर आणि प्रवेश अर्ज शुल्क निश्चित करायचे आहेत. महाविद्यालयांसाठी राहील मॅनेजमेंट कोटाकेंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर २0 टक्के जागा महाविद्यालयातील मॅनेजमेंट कोट्यासाठी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला कनिष्ठ महाविद्यालयांचा विरोध लक्षात घेता, शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांसाठी काही जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.