शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

६.६८ लाख कुटुंबांनी घेतला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ

By admin | Updated: November 20, 2015 01:58 IST

ग्रामीण भागातील गरजूंना आता उपचार मिळणे सोपे.

खामगाव (बुलडाणा) : आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा २0१२ पासून ६ लाख ६८ हजार १८0 कुटुंबांनी लाभ घेतला आहे. दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या योजनेंतर्गत मदत केली जात असल्याने, ही योजना गरीबांसाठी संजीवनी ठरत आहे. शासनाने सन २0१२ पासून गरीबांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शस्त्रक्रियासारखे महागडे उपचारसुध्दा मोफत केले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पिवळे व केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक पात्र ठरतात. सुरुवातीला ही योजना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती; मात्र या योजनेची उपयोगिता पाहता ही योजना आता संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आता गावागावात आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात असून, यामध्ये आढळलेल्या दुर्धर आजाराच्या रुग्णांवर उपचार, तसेच गरज असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. प्रतिवर्ष प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंतचे उपचार या योजनेअंतर्गत मोफत करण्यात येत आहेत. दरवर्षी या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्यासुध्दा वाढती असून, त्यामुळे ग्रामीण भागातील गरजूंना आता उपचार मिळणे सोपे झाले आहे.