शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

रद्द झालेल्या ६६२ सिंचन विहिरींची कामे पुन्हा करणार!

By admin | Updated: November 25, 2015 02:18 IST

पाच तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश.

अकोला: राज्य रोजगार हमी योजना आणि धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या ६६२ सिंचन विहिरींची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) परत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील लाभार्थी शेतकर्‍यांची संमती घेण्यात आली. राज्य रोजगार हमी योजना आणि धडक सिंचन विहीर योजना अंतर्गत मंजूर सिंचन विहिरींची कामे अग्रिम देऊनही सुरु करण्यात आली नव्हती. जिल्ह्यातील अशा ६६२ सिंचन विहिरींची कामे जिल्हा प्रशासनामार्फत रद्द करण्यात आली होती. सिंचन विहिरींचा अनुशेष भरून काढण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कामे नव्याने सुरू करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार या सिंचन विहिरींची कामे परत सुरू करण्यासाठी संबंधित शेतकर्‍यांची संमती घेऊन, लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकार्‍यांनी त्यानुसार पाच तालुक्यांतील रद्द करण्यात आलेल्या ६६२ सिंचन विहिरींची कामे सुरू करण्याबाबत संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांची संमती घेऊन पात्र लाभार्थ्यांंची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपविली आहे. पात्र लाभार्थींमध्ये आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील शेतकर्‍यांचा समावेश आहे.

दोन तालुक्यांतील रद्द

विहिरींची माहितीच नाही! रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कामे परत सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील रद्द विहिरींची माहिती पंचायत समित्यांकडून प्राप्त झाली असली तरी अकोला व तेल्हारा या दोन तालुक्यांतील रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची माहिती या दोन्ही पंचायत समित्यांकडून २४ नोव्हेंबरपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाकडे प्राप्त झाली नाही.

रद्द विहिरींची माहिती आयुक्तांकडे!

जिल्ह्यातील रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कामे परत सुरू करण्यासाठी संमती घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच समित्यांमार्फत प्राप्त माहितीच्या आधारे ६६२ रद्द सिंचन विहिरींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागामार्फत २३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहयो विभागाकडे सादर करण्यात आली.