शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रिव्हॉल्वरसह ५५ हजार जप्त

By admin | Updated: July 7, 2014 23:57 IST

सोनेरी टोळीला न्यायालयीन कोठडी

वाशिम : स्वस्त भावात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुटणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने ७ जुलै रोजी पर्दाफाश केला. या गुन्ह्यामधील तीनही आरोपींना मालेगाव येथील न्यायालयात आज ७ जुलै रोजी हजर केले असता न्यायाधिशांनी तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर, दोन जिवंत काडतुसे व एक सोन्याची अंगठी जप्त केली. प्राप्त माहितीनुसार जानेवारी २0१४ मध्ये नांदेड येथील एका शेतकर्‍याला लक्ष्मण उर्फ मिथुन मधुकर चव्हाण, नरेश भवरलाल पवार व राजेश भवरलाल पवार या तिघांनी संगनमत करून कमी भावामध्ये सोने देण्याचे आमिष दाखवून त्याला मालेगाव तालुक्यातील पांगरखेड येथे सोने खरेदीसाठी बोलावले होते. नांदेड येथील शेतकरी दीपक वसंतराव भोरे व त्याच्यासोबत वर्षा श्रीकांत जोंधळे हे दोघे सोने खरेदी करण्यासाठी आले. उपरोक्त तीन आरोपींनी भोरे व जोंधळे या दोघांवर हल्ला चढवून त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम, महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व रिवाल्हर असा एकुण दोन लाख ४ हजाराचा ऐवज लंपास केला. त्यावेळेसपासुन तीनही आरोपी पसार होते. या आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. पोलिस अधिक्षक तुषार पाटील व पोलिस निरिक्षक संग्राम सांगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस उपनिरिक्षक कैलास इंगळे, उत्तम गायकवाड, विनोद अवगळे, संदीप इढोळे, विपुल शेळके, धनंजय अरखराव, नंदकिशोर भडके आदींचा समावेश असलेल्या पथकाला उपरोक्त आरोपी पांगरखेडा येथे आले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे अटक करण्यात यश आले.या आरोपींकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर, दोन जिवंत काडतुसे व एक सोन्याची अंगठी असा एकुण ५५ हजार ५00 रूपयाचा ऐवज जप्त केला. या तिन्ही आरोपींकडून ईतर गुन्ह्यातील माहिती प्राप्त होण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडी मिळण्यासाठी मालेगाव न्यायाधिशांना अर्ज सादर केला होता.पोलिसांची मागणी खारीज करीत न्यायालयाने या आरोपिंना आज ७ जुलै रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. (नगर प्रतिनिधी)