शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५0 टक्के क्षेत्रावरच पेरणी!

By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST

पावसाअभावी व-हाडात पेरण्या खोळंबल्या.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांत ५0 टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचा आनंद द्विगुणित झाला होता; तथापि सध्या पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांमध्ये खरिपाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ८३ हजार ८00 हेक्टर असून, २९ जूनपर्यंत १६ लाख हेक्टरच्यावर पेरणी पोहोचल्याचा अंदाज आहे. शेतकर्‍यांनी यंदाही सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनचे क्षेत्र या विभागात सहा लाख हेक्टरवर पोहोचले आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक ४ लाख हेक्टरच्यावर पेरणी आटोपली आहे. त्या खालोखाल २६ जूनपर्यंत बुलडाणा जिल्हय़ात ३ लाख ४१ हजार ६00 हेक्टर म्हणजेच ४६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वाशिम जिल्हय़ात २,८000 हेक्टर ६८ टक्के , अमरावती १ लाख ३५ हजार १९ टक्के, तर अकोला जिल्हय़ात केवळ १ लाख ३६ हजार ५00 हेक्टर म्हणजेच २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

*सोयाबीनचा पेरा वाढला

पाच जिल्हय़ांत सुरुवातीला कपाशीने आघाडी घेतली होती. आता सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, शुक्रवारपर्यंत ६ लाख हेक्टरवर शेतकर्‍यांनी सोयबीनचा पेरा केला. कापसाचे क्षेत्रही ४ लाख ८८ हजार १00 हेक्टरच्यावर पोहोचले आहे. मूग २८,९00, उडीद १ लाख ८७ हजार, तर तुरीची १ लाख २५ हजार ७00 हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे.

*पाऊस असमान

पाच जिल्हय़ांत १ ते २६ जूनपर्यंत (सरासरी १३२.२ मि.मी.) प्रत्यक्ष १७८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील घाटाखालील जिल्हय़ाला पावसाची प्रतीक्षा आहे. २६ जूनपर्यंत बुलडाणा जिल्हय़ात ११८.२ मि.मी., अकोला जिल्हा ११२.७ मि.मी., वाशिम जिल्हा १४२.१ मि.मी., अमरावती जिल्हय़ात १२६.५ मि.मी., तर यवतमाळ जिल्हय़ात १५२.२ एवढा पावसाची नोंद झाली आहे.