अकोला : महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या बदल्यांचा पोळा अखेर शनिवारी फुटला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ५0 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक इत्यादी संवर्गातील कर्मचार्यांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर, महसूल कर्मचार्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू झाली. बदल्यांचे आदेश केव्हा निघतात, याकडे जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांचे लक्ष लागले असतानाच, जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी ५0 कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी निर्गमित केले. त्यामध्ये १३ मंडळ अधिकारी आणि १३ अव्वल कारकून अशा २६ कर्मचार्यांच्या अदलाबदलीने बदल्या करण्यात आल्या असून, प्रशासकीय व विनंतीवरून १३ अव्वल कारकून कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कनिष्ठ लिपिक संवर्गातून ११ कर्मचार्यांच्या पदोन्नतीने अव्वल कारकून म्हणून बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या महसूल कर्मचार्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयांमधील कर्मचार्यांचा समावेश आहे.
महसूल विभागातील ५0 कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 1, 2014 00:55 IST