शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

आदर्श गाव योजनेत ४७ गावे !

By admin | Updated: December 25, 2014 23:37 IST

अमरावती विभागातील १२ गावांचा समावेश.

संतोष येलकर/अकोला : गावांच्या सर्वांंगीण विकासाच्या दृष्टीने आदर्श गाव संकल्प योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४७ गावे समाविष्ट करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील १२ गावांचा समावेश आहे.आदर्श गाव संकल्प योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावाच्या सर्वांंगीण विकासाच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना गावांमध्ये राबविल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या वेगवेगळ्या १२ विभागांमार्फत राबविल्या जाणार्‍या ५९ योजनांचा समावेश आहे. आदर्श गाव योजनेंतर्गत राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठित करण्यात आली असून, या समितीस योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील शंभर गावे निवडण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराच्या अधीन राहून, आदर्श गाव योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४७ गावे समाविष्ट करण्यास २२ डिसेंबर रोजी शासनाच्या जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आदर्श गाव योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील १२ गावांचा समावेश आहे.आदर्श गाव योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना, गावाचा सर्वांंगीण विकास करुन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या योजनेत ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर.सरदार यांनी स्पष्ट केले. *पाणलोट क्षेत्र विकास योजनेचा गाभा!आदर्श गाव योजनेत विविध १२ विभागाच्या ५९ योजनांचा समावेश आहे. त्यापैकी पाणलोट क्षेत्र विकासाचे काम योजनेचे गाभा क्षेत्र आहे. इतर विभागाचे काम बिगर गाभा क्षेत्र म१हणून वर्गीकरण करण्यात आले आहे.योजनेत समाविष्ट अमरावती विभागातील गावे!जिल्हा संख्या गावांचे नावअमरावती       0३ रामागड,वडाळ गव्हाण,कवठा बहाळे अकोला          0१ कपिलेश्‍वरवाशिम           0१ साखराबुलडाणा           0२ खेर आणि वकाणायवतमाळ         0५ पाथरट (गोळे), चोंडी, कोठोडा, निंबा, पिंपळदरा......................................एकूण                १२