शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची ४४ कोटींची पाणीपट्टी थकीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:23 IST

आॅगस्ट अखेरपर्यंत ४४ कोटी १९ लाख ९६ हजार १५९ रुपये पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे.

अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आॅगस्ट अखेरपर्यंत ४४ कोटी १९ लाख ९६ हजार १५९ रुपये पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर व तेल्हारा या चार तालुक्यांतील गावांसाठी सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील खांबोरा ६० गावे व ४ गावे, अकोट व तेल्हारा तालुक्यातील ८४ खेडी आणि बाळापूर तालुक्यातील कारंजा-रमजानपूर, लोहारा व वझेगाव इत्यादी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमध्ये पाणी पुरवठ्यापोटी पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे; परंतु अकोला, अकोट, बाळापूर व तेल्हारा या तालुक्यांतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आॅगस्ट अखेरपर्यंत ४४ कोटी १९ लाख ९६ हजार १५९ रुपये पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या कामाकडे संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव सामोर येत आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सहा ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत.- किशोर ढवळेकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक