शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात हवाल्याची ४३ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST

अकोला : अकोल्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाकडे सुमारे ४३ लाख रुपयांची रक्कम देण्याच्या बेतात असलेल्या एका युवकास ...

अकोला : अकोल्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाकडे सुमारे ४३ लाख रुपयांची रक्कम देण्याच्या बेतात असलेल्या एका युवकास अकोला रेल्वेस्थानकावर सुमारे ४३ लाख ३०० रुपयांच्या रोकडसह अकोला आरपीएफने गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. या रकमेचे कोणतेही दस्तावेज नसल्याने ही रक्कम हवाल्याची असल्याची माहिती समोर आली आहे.

सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या शास्त्री नगर येथील रहिवासी मनोज हरिराम शर्मा (२२) हा सुमारे ४३ लाख ३०० रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर होता. ही बॅग तो विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे देणार होता; ती बॅग ज्या प्रवाशाकडे देणार होता त्या प्रवाशाचे नाव किंवा इतर माहिती शर्मा याच्याकडे नव्हती, मात्र दि पप्पी शॉप स्टेशन रोडच्या मालकाने बोगी बी ४ च्या दारात उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हातात देण्याचा इशारा शर्मा यास करण्यात आला होता; मात्र याची माहिती अकोला आरपीएफला मिळताच त्यांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. मनोज शर्मा हा रोकड असलेली बॅग रेल्वेतील प्रवाशाच्या हातात देत असताना अकोला आरपीएफने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. रेल्वेतील प्रवासी हा आतमध्ये निघून गेला; मात्र अकोला आरपीएफच्या ताब्यात मनोज शर्मा लागला. तसेच रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या रकमेचे विवरण तसेच दस्तावेज मागितले असता मनोज शर्मा याने दस्तावेज देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही रक्कम हवाल्याची असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रकरण अकोला आरपीएफने जीआरपीकडे पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास जीआरपी पोलिसांनी सुरू केला असून नेमकी रक्कम कोणाची आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

यापूर्वी पकडले होते एक कोटीचे सोने

मुंबईवरून अकोल्यात आलेल्या एका युवकाकडे तब्बल १ कोटी रुपयांचे सोन्याचे बिस्कीट असल्याच्या माहितीवरून त्यावेळी रामदासपेठ पोलिसांनी १ कोटी रुपयांचे सोने पहाटेच्या सुमारास पकडले होते. यासोबतच रक्कमही जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास त्यावेळी केला असता अकोल्यातील बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती; मात्र त्यावेळी हे प्रकरण दडपण्यात आले होते. आता ४३ लाख रुपये रकमेच्या सखोल तपास झाल्यास अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

अकोला हवाल्याचे मोठे केंद्र

अकोल्यातून रेल्वेने मोठ्या प्रमाणात रक्कम पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. अकोला हवाल्याचे मोठे केंद्र असून याचा म्होरक्या अकोल्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे. दर दिवसाआड मोठ्या प्रमाणात रक्कम मुंबईला पाठविण्यात येते. यामध्ये शासकीय यंत्रणाही सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.